बरेच दिवस झले , सगळ कस निवांत चालल होत, मोदी सरकार आल, आता मी निवांत विश्रांती घेऊ शकतो . पण आत्ता कुठे थोडस डोळे मिटत होतो तोच दरवाज्याजवळ दोन मुली दिसल्या, शेजारी बसलेल्या बायकोला विचारलं "कोण आहेत ग मुली ? जरा पहतेयस का ? "आहो उत्तर भारतातील बदायु गावातून आल्या आहेत मुली जाऊन भेटते , आलेच हां " आस म्हणत बायको उठली पण तिच्या डोळ्यातलं पानी स्पष्ट दिसत होत. त्या दोन मुलींना पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले आणि परत हलकासा डोळा लागतोच तोच बायको आली, "काय मेल या महागयीच,आता परत रेल्वे भाडे महागणार, आणि हे काय आता, ग्यास, पेट्रोल, डीसेल, आरे आरे साखर पण महागणार वाटत." "आग जरा शांत बस बघू तू " मी उगाचच काहीतरी बोलून तिला शांत करण्याचा वायफळ प्रयत्न केला , अगदी नेहमीसारखा. "गप्प बसा हो, तुमच काय जातय बोलायला, काही दिवसांनी पाहुणेमंडळी येतील घरी तेंव्हा साखर आहे का ते पाहते" बायको तावातावाने स्वयपाक घरात गेली. बर झाल कटकट गेली आस म्हणत मी परत डोळे मिटले.
"साई भक्तांनी रामा चि पूजाकरणे बंद करावे " एक आस विचित्र वाक्य कानी पडल आणि मी रागाने ओरडलो "कोण आहे रे तिकडे , कोण हा माणूस ?" माझा रागीट आवाज ऐकून बायको स्वयपाक घरातून बाहेर आली, "अहो ओरडता काय , नेहमिच आहे हे , आणि हो ऐका मी शेजारच्या लक्ष्मी बाईंकडून साखर आणते, उगाच डोक्याला त्रास होईल आस विचार नका करू."
बायको गेली पण माझ्या डोक्यात तोच विचार , आस कस बोलू शकतो कोणी, नाही , नाही छे छे , इतका कसा बदलला माणूस. इतिहासा मध्ये हा माणूस जमिनीसाठी भांडला, त्यानंतर धर्मासाठी , नन्तर नन्तर तर धर्मा धर्मा मध्ये भांडला , भांडला काय भांडतोय. पण हे काय, आज तर कहरच केला चक्क चक्क देवा वरच वार केला. आरे काय पडतो फरक, कि कोण कोणाची पूजा करतो ते ? परमेश्वर तर सर्वत्र आहे, साई मध्ये काय आणि राम मध्ये काय. सबका मलिक एक है !! काही काही कळत नाही या लोकांच येवडी ज्ञानी लोग, येवडी शिकलेली, येवडी विद्वान, पण आश्या विधांमुळे त्यांच्या विद्वातेवर प्रश्नचिन्ह पडते. विद्वान लोकांच आस तर सर्वसामान्य मानसाच काय, तो पण लागला कालवा करायला, आरे वेड्या "शोधिसि मानवा राउळी मंदिरी, देव हा नांदतो आपुल्या अंतरी " .आपल मन स्वच पवित्र आसले कि परमेश्वर आपल्याच अंतकरणात आहे हि साधी गोष्टं या लोकाना का काळात नाही.
"आहो चला उठा, तयारीला लागा, थोड्याच दिवसात वारकरी येतील घरी, का नुसते कमरेवर हाथ ठेवून उभे राहणार आहात ?" बायको घरात येतयेत बडबडली.
हे बलात्कार, मारामारी, धर्माच्या नावावर दंगली, भ्रष्ठ आचरण आणि देवा देवा वरून वाद, हे सगळ पाहिलं कि आस वाटत " मी माणूसच जन्माला घातला ना? खर सांगू रुख्मिणी या वेळी कोणा कोणाला आशीर्वाद द्यायचा हा मोठा प्रश्नच आहे " आस बोलत मी कमरेवर हाथ ठेवून, शांतपणे विटेवर उभा राहिलो.
No comments:
Post a Comment