Saturday 9 August 2014

गेला माधव कुणीकडे !!!

सकाळचे ९ वाजले,ऑफिसला जायची वेळ झाली , मी  पार्किंग मधे येउन माझी गाडी काडली, तोच एक आवाज आला "आहो जोशी काका कसे आहात ?" मी वळून पहिले , तो व्यक्ती माझ्या जवळ आला अतिशय प्रेमाने आणि गोडपणे  त्याने माझे कौतुक करायला सुरवात केली. " काका  मध्यंतरी तुम्ही घर घ्यायचं म्हणत होता ना ? आहो माझा एक मित्र स्वतः बिल्डर आहे,चांगली ओळख आहे आपली आणि त्याची , एकदम स्वस्तात घर घेऊन देतो तुम्हाला मी ." तो व्यक्ती बोलतच राहिला "आणि काय हे काका , रेन कोट नवीन घ्याना आता, हे 'कीर्ती' शोरूम आहे पाहा तिथे माझा एक जवळचा मित्र काम करतो, आपण जाऊ एकदा तुम्हाला रेन कोट घ्यायला, आहो बाकीच्यांना तिथे १०% सुट आहे माझ्याबरोबर गेलात तर २०%सूट देईल तो तुम्हाला रेन कोट वर. काका जरा ते नाक्यावर सोडता का ?" येवड बोलला आणि "माधव गोडबोले" शांत झाले, मी गाडी ला किक मारली "बसा" आस म्हणत आम्ही दोघे चाललो


मी गाडी चालवत शांत पणे विचार केला, हा माधवराव गोडबोले गेल्या ६ महिन्या मध्ये मला ४ वेळा भेटला असेल आणि त्याने न जाणो असे किती तरी वेळा मला कधी घर स्वस्तात तर कधी आणखी काही स्वसात देण्याचे आमिष दाखवून लिफ्ट घेतली असेल.  माधव मला नेहमी काहीतरी सांगतो आणि नंतर पून्हा गायब होतो , आस म्हणाना, कि त्याचे काम झाले कि माधव ला शोधावे लागते. एकदा दोनदा तर मी त्याला फोन करून बोलावले  आणि चल म्हंटल आपण रेन कोट घेऊ किंवा घर घ्यायाल त्या बिल्डर ला भेटायला जाऊ पण त्याने काहीना काही कारण देऊन नेहमी टाळले. आज मात्र माझी नक्की खात्री पटली कि हा माणूस फ़क़्त गोड बोलतो, ते हि कामापुरता. "पक्का गोडबोले आहे".

तोच ट्रफिक सिग्नल लागला म्हणून गाडी थांबवली आणि समोरून एक भाजीवाला  चाललेला, त्याला पाहून उस्पुर्थपने बोललो " आजकाल भाजीपाल खरेदी करणे म्हणजे दिवाळीच्या  खरेदीला जाण्यासारखं आहे", येवढ बोललो आणि जिब चावत विचार केला आता हा गोडबोले कोणत्या भाजीवाल्याची ओळख सांगतोय काय माहिती तेवढ्यात गोडबोले बरललाच पण यावेळी जरा वेगळ " जोशी काका सांगू का हे सगळं त्या  राजकारण्यांमुळे , आहो जेंव्हा जेंव्हा  निवडणूक आसते तेंव्हा लाचार माणसासारखे मत मागायला येतात, महागाई कमी करू आशी आश्वासने देतात, आणि एकदा का काम झाल कि मग गेले बोम्बलत लोक,  इथे महागाई तर रोजचे रोज वाडताच चालली आहे." माधवराव बोलतच राहिले "आहो हे  सगळे नेते मंडळी निवडणुकीच्या अगोदर किती गोड गोड बोलतात आणि निवडणुकी नंतर कमीत कमी पाच वर्ष तरी भेटायला येत नाहीत , सगळे नुसते गोडबोले आहेत" हे ऐकलं आणि जरा चमकलोच मिच, गोडबोले दुसर्याला काय गोडबोले म्हणतोय . पण एक आहे "जसी प्रजा तसा राजा" आसे माधवराव आपल्या नेतेमंडळीतच नाही तर गल्ली गल्ली मधे आहेत, फ़क़त फरक एक आहे गल्लीतला माधव राविवारी तरी  दिसतो पण राजकारणातला माधव एकदा गेला कि मग "गेला माधव कुणीकडे " आस म्हणत टाळ कुटत भजन म्हणावे.