Monday 20 October 2014

अखंड महाराष्ट्र !!!


महाराष्ट्र विधान सभा निवडणूकीचे नुकतेच निकाल लागले.  महाराष्ट्रा च्या जनतेने कोणालाच स्पष्ट बहुमत दिले नाही. येवडी गोंधळात महाराष्ट्राची जनता अगोदर कधिच नव्हती. महाराष्ट्र , आसे राज्य जिथे कशाचीच कमतरता नाही, नैसर्गिक साधन सामग्री, जोरात विकासाची गती पकडलेले राज्य, मराठी माणूस ते मायानगरी मुंबई पर्यंत कशाचीच कमतरता नाही. मराठी माणूस तसा एकदम सुखी, विधार्भातले शेतकऱ्यांची आत्महत्या सोडल्या तर मराठी माणूस तसा खरच सुखी आहे. भाजप सरकारने गेल्या काही दिवसात केलेली देशाची प्रगती, अचूक निर्णय, विरोधी पक्षानवर केलेले तीक्ष्ण प्रहार, आटोक्यात आणलेली महागाई, पेट्रोल चे कमी झालेले दर असोत वा बटाट्याचे कमी झालेले दर असोत पण भाजप सरकार ने अगदी जादू केली. हो पण हे भाजप सरकार केंद्रातले दिल्लीतले महाराष्ट्रातले कॉंग्रेस सरकार होते. आता एवडे सगळे छान छान भाजप ने निर्णय घेतले मग मराठी जनतेने भाजपला पूर्ण बहुमत का नाही दिले ? येवडी गोंधळात मराठी जनता कधीच नव्हती.

चित्र कस अगदी स्पष्ट आहे. सरकार स्थापणे साठी गरज आहे ती १४५ जागांची पण आहेत कुणाकडे ? कुणाकडेच नाहीत. यावेळी शिवसेना आणि भाजप ची युती नव्हती, ती तुटली याला कारणीभूत  कोण ते मला माहिती नाही पण त्यामुळे मते  मात्र विभागली आणि आशी काही विभागली कि त्याचा सरळ सरळ फायदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ला झाला. निवडणुकी  पूर्वी बरेच गणिते मांडली गेली होती, मेडिया ने तर "exit poll" द्वारे भाजप ला पूर्ण बहुमत घोषित केले होते पण प्रतेक्षात काही वेगळेच दिसले. ज्याठिकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ला  जस्तिस जास्त दोघांना मिळून ५० जागा मिळणार होत्या तिथे  त्यांच्या जागा ८३ पर्यंत गेल्या. नक्कीच या ३३ जागा या भाजप आणि शिवसेनेच्या आहेत पण आम्ही ३३ जागांचे नुसकान सहन करू शकतो पण खुर्ची चे नुसकान नाही सहन करू शकत ना, खुर्ची चा लोभ भाजपला हि होता आणि शिवसेनेला हि.  लोकसभा निवडणुकीच्या आगोदर बिहार मध्ये जसे नितिश कुमार ने भाजप मधून पाय काडले आणि त्याचा फायदा भाजप लाच झाला तसा फायदा महाराष्ट्र मध्ये भाजप ला झाला पण म्हणावा तितका नाही. मराठी माणूस कधीच गोंधळलेला नव्हता त्याला गोंधळात पाडला तो या राजकारण्यांनी, नाहीतर तसही स्पष्ट बहुमत भाजप + शिवसेनेला दिले आहे. निवडणूक होऊन एक दिवस झाला, आजून कोण कोण मिळून सरकार बनवणार याबद्दल काहीच कळत नाही. मराठी माणसाला विचाराल तर भाजप आणि शिवसेने ने एकत्र यावे पण मग  घोळ होतो तो "CM " चा.

या सर्व राजकारण्यांनी नि मिळून मराठी माणसाची थट्टा केली. आम्ही कुणाचेच नाही आस म्हणत प्रत्येकाने एकटे निवडणूक लढवली पण आता कोणाचा न कोणाचा तरी हात किंवा बाहेरून support हा घ्यावाच लागेल. अगोदर मराठी माणसाच्या मराठी वरच्या प्रेमाचे राजकारण केले आणि आता अखंड महाराष्ट्र चे राजकारण केले. आरे किती किती खेळणार आहात मराठी माणसाच्या भावनांशी? बेळगाव चे राजकारण कमी पडल का ते आता विधार्भावर राजकारण करताय ? 
अखंड महाराष्ट्र ची  काळजी कारानार्यानो अगोदर स्वतः अखंड राहा आणि मग महाराष्ट्रा च्या अखंडतेची  काळजी दाखवा. माझा महाराष्ट्र अखंड होता आणि अखंड राहील .
जय महाराष्ट्र !!!!