Wednesday 5 November 2014

एक निरंतर प्रकाश !!!

शक्यच नहीं, हे फिल्म वाले कहिहि दाखवतात, आसही कोणी माणूस आसु शकतो का ? अरे कहिहि दाखवतात. या स्वार्थी जगामधे, ऐहिक सुखासाठी आसुसलेल्या लोकांमधे, तुटपुंज्या जमिनीसाठी भावाच्या जीवावर उठणाऱ्या  या लालची दुनियेत असाही कोणी व्यक्ति अगदी निस्वार्थी, करुणामय, प्रेमळ, मायाळु, आणि स्वताचे पूर्ण आयुष्य दिन दुबळ्यांसाठी वाहून देणारा असेल यावर विश्वासच बसत  नाही .

परवा एक मराठी फिल्म पहिली "डॉ. प्रकाश बाबा आमटे " अप्रतिम निर्मिति, फिल्म पहिली आणि आस वाटले की आपण किती तुच्छा आहोत या प्रकाशपुठे. या पृथ्वीतलावर कदाचितच आसे कोणी आस्तितवात असेल. आदिवासी लोकांची निस्वार्थी आणि अविरत सेवा, प्राणिमात्रांवर जीवपाड़ प्रेम एवढ जमत कस या माणसाला, I  mean खरच हा, या अजकालच्या शहरी मनाला लोभणाऱ्या दुनियेत आसा मानुस आसन म्हणजे आश्चर्यच.  तस पहिल तर काय कमी आहे प्रकाश कड़े , चांगली डॉक्टर ची डिग्री, छान पैकी एखाद्या शहरात दवाखाना टाकून बक्कळ पैसा कमवला आसता कोणीही विचारले नसते की आदिवस्यांची सेवा करायला या म्हणून, इतकी उदारता ? नहीं यार हा माणूस वेडा आहे हो वेडा, दिनदुबळ्याची सेवा करण्यासाठी वेडा. या माणसाने कधीही कंटाळा नहीं केला, दिवस, रात्र, उन, पाऊस प्रतेक क्षणी आदिवासी लोकांची सेवा करने त्यांच्यावर उपचार करने हे इतके सहज नव्हते. पाहिले कहिदिवस तर त्यानी फ़क़त वाट पहिली, आदिवासी लोकांच्या मनातली अंधश्रद्धा दूर करून त्याना मानुस असण्याची जाणीव करून देने आणि मानसासारखे जगायला शिकवणे. फिल्म मधे दाखवले ते फार थोड़े प्रसंग आहेत पण या आमटेनवर फिल्म काढ़ने आवघड आहे प्रतेकक्षात त्यांच्या आयुष्याला एका फिल्म मधे बसवाने शक्यच नाही .



















आज ऑफिस मधल्या air conditioner केबिन मधे बसून हा विचार blog वर लिहीने फार सोप आहे. तस पहिल
तर मला कोणी आडवले आहे ? मनामधे एक प्रश्न आला मी का नाही करत लोकांची सेवा ? खरच सोप नाही जनसेवा करण. काही लोक आजकाल पैसे देऊन मदत करतात आसो कमीत कमी कसली तरी मदत करत आहेत हि लोक पण मी आजून काहीच नाही केल याची खंत ही फिल्म पहिल्या नंतर आली. वेळ मिळाला नाही आस नाही ब्लोग लिहायला वेळ मिळतो,  TV पाहायला वेळ मिळतो, WeekEnd ला ट्रीप काढायला वेळ मिळतो, फिल्म पाहायला वेळ मिळतो पण दिन दुबळ्यांची सेवा करायला वेळ मिळत नाही, खरच का ? वेळ मिळतो हो तो काढायला हवा, मी आस नाही म्हणत कि WeekEnd ला ट्रीप ला जाऊ नका किंवा TV पाहू नका ते प्रतेकान ठरवायचे कि काय करायचे ते. पण मला आस वाटत कि वेळ मिळत नाही या पेक्षा तेवढ धाडस नाहीये, धाडस नाही जनसेवेचे, शेवटी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा पण ती पूर्णपणे निस्वार्थी हवी ती केवळ प्रकाश सारखा माणूसच छे  छे  नुसता माणूस नव्हे तर प्रकाश सारखा युगपुरुषाच करू शकतो.


No comments:

Post a Comment